• नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती 'पराक्रम दिवस' म्हणून साजरी केली जाते.
जन्म : २३ जानेवारी १८९७ रोजी कटक, ओरिसा
१९२१ : ICS परीक्षा उत्तीर्ण
१९३८ : मध्ये ते काँग्रेसचे हरिपुरा अधिवेशन अध्यक्ष झाले.
१९३९ : मध्ये काँग्रेसचे त्रिपुरी अधिवेशन अध्यक्ष परंतु महात्मा गांधींसोबत मतभेद झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला. त्यानंतर बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
१९३९ : फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
१९४१ : रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून निसटले.
१९४३ : हंगामी सरकार स्थापना
सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले
आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.
आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील 'अंदमान व निकोबार' ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे 'शहीद व स्वराज्य' असे केले
नेताजी सुभाषचंद्र बोस
January 23, 2025
0