✳️ राज्यातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? -उमाकांत दांगट
✳️ जम्मू-काश्मीर मधील सोनबर्गमध्ये कोणत्या बोगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली? -झेड-मोढ बोगदा
✳️ भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाली असून स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरला?-चौथा
✳️ जम्मू आणि काश्मीरमधील झेड-मोढ बोगद्याची एकूण लांबी किती किमी आहे? - 6.5 किमी.
✳️सध्या तांदूळ उत्पादनात भारत जगात कितव्या स्थानी आहे? -दुसरा (चीन प्रथम)
✳️ वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे? -मुंबई (पुणे-चौथा)
✳️ राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो? - 14 जानेवारी.
✳️ 18 वा भारतीय प्रवासी दिवस 2025 कोठे संपन्न झाला? -भुवनेश्वर (ओडिशा)
✳️ 2024 च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते? -कोलकाता
✳️ राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? - 12 जानेवारी
✳️ इस्त्रोने कोणत्या अवकाश संशोधन केंद्रावरून अंतराळ डॉकिंग प्रयोगास सुरुवात केली? -श्रीहरीकोटा.
राष्ट्रीय घडामोडी
January 27, 2025
0