🔵 चौरसाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे क्षेत्रफळ चौपट होते.
🔵 गोलाची त्रिज्या दुप्पट केल्यास घनफळ आठपट होते.
🔵 त्रिकोणाची उंची व पाया दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
🔵 घनाची बाजू दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ आठपट होते.
🔵 वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होते.
🔵 आयताची लांबी दुप्पट व रुंदी निमपट केली तर क्षेत्रफळ तेवढेच राहते.
🔵 दोन घनांच्या घनफळांचे गुणोत्तर हे त्याच्या बाजूंच्या मापाच्या घनाच्या पटीत असते.
🔵 कोणत्याही आकृतीचे क्षेत्रफळ चौपट होते म्हणजे पूर्वीपेक्षा 300 टक्क्यांनी वाढते.
🔵 दोन चौरसांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या बाजूंच्या मापाच्या वर्गाच्या पटीत असते.
🔵 आयताची लांबी व रूंदी दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होते.
🔵 लांबीची एकके सेमी, मीटरमध्ये मोजतात.
🔵 क्षेत्रफळांची एकके चौरस सेमी, चौरस मीटरमध्ये असतात.
🔵 घनफळांची एकके घनसेमी, घनमीटरमध्ये असतात.
🔵 घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 30⁰ असते.
🔵 वर्तुळाच्या परिघाचे माप 360° असते.
🔵 n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज = (2n-4)x90
🔵 बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनाच्या मापांची बेरीज 360° असते.
🔵 n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बाह्य कोनाचे माप 360/n असते.
🔵 दोन लगतच्या दिशांमध्ये 90° चा कोन असतो.
🔵 दोन लगतच्या उपदिशांमध्ये 90⁰ चा कोन असतो.
🔵 मुख्य दिशा व लगतची उपदिशेमध्ये 45⁰ चा कोन असतो.
🎯 हे लक्षात ठेवा 🎯
February 01, 2025
0