🔖१९८७ बॅचचे आयएएस अजय सेठ हे अर्थ मंत्रालयाचे नवे वित्त सचिव असतील. अजय हे माजी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची जागा घेतील.
🔖 कार्मिक मंत्रालयाने अजय सेठ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
🔖१ मार्च रोजी तुहिन कांत पांडे यांची सेबीचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यापासून वित्त सचिव पद रिक्त होते.
🔖अजय सेठ सध्या महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. याआधी यांनी आर्थिक व्यवहार विभागात सचिवपदही भूषवले आहे.
🔖वरिष्ठ नोकरशहा अजय हे त्यांच्या कार्यक्षम व्यवस्थापनाच्या अनुभवासाठी ओळखले जातात. आर्थिक व्यवहार सचिवपद भूषवत असताना, अजय यांनी देशाची आर्थिक धोरणे आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
🔖अजय सेठ यांना २०१३ मध्ये पंतप्रधान प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
🔖कर्नाटकातील व्यावसायिक कर प्रशासनाच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला.
🔖अजय सेठ यांच्या नियुक्तीमुळे देशातील आर्थिक व्यवस्थापन आणि सार्वजनिक वित्त क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
अजय सेठ नवे वित्त सचिव
March 26, 2025
0