◆ आर्थिक वर्षे 2024- 25 तिसऱ्या तिमाहीत भारतातील SBI बँक सर्वाधिक नफा कमावणारी बँक ठरली आहे.
◆ भारतीय वायुदलाने C-133 विमानाने म्यानमारला मदत सामग्री पाठवले आहे.
◆ यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार विजय केळकर यांना जाहीर झाला आहे.
◆ म्यानमार भूकंपग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे.
◆ महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे सदस्य एस चंद्रशेखर हे आहेत.
◆ केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात 56 नद्या गंभीरित्या प्रदूषित आहेत.
◆ देशातील फळांच्या निर्यातीपैकी 50 टक्के निर्यात सोलापूर जिल्ह्यातून होते.
◆ सरस्वती सन्मान पुरस्काराची स्थापना 1991 साली झाली होती.
◆ 34वा सरस्वती सन्मान 2024 साधू भद्रेशदास यांना जाहीर झाला आहे.
◆ भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी सी. एस. शेट्टी यांची निवड झाली आहे.
◆ भारत-रशिया संयुक्त नौदल सराव इंद्राच्या 14 व्या द्वैवार्षिक आवृत्तीची सुरुवात बंगालच्या उपसागरातील चेन्नई किनाऱ्यावर झाली.
◆ इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट 30 मार्च रोजी साजरा करण्यात आला आहे.
◆ नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25 चे विजेतेपद हरियाणा ने पटकावले आहे.
◆ FIH ज्युनिअर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन तामिळनाडू राज्यात करण्यात येणार आहे.
◆ अमेरिकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टर पदी डॉ. जय भट्टाचार्य यांची नियुक्ती केली आहे.
◆ थायलंड मध्ये सहावे बिमस्टेक संमेलन होणार आहे.
◆ पंतप्रधान मोदींनी 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग"ही थीम जाहीर केली आहे. [आंतरराष्ट्रीय योग दिवस :- 21 जून]
◆ 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत(अहिल्यागर) याठिकाणी पार पडली आहे.
महत्वाच्या चालू घडामोडी....
March 31, 2025
0